पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटामध्ये म्हणजेच पवार कुटुंबातील राजकीय वाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला. त्यानंतर येती लोकसभा निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह बहाल केले आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला दिले. त्यानंतर शरद पवार गटाने ३ चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर मांडला होता. त्यामध्ये वडाचं झाड, कपबशी, आणि शिट्टी यांचा समावेश होता. मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केले आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षाचं नवीन चिन्ह… #तुतारी
वाजली #तुतारी म्हणजे लढाईला तोंड फुटलं…#तुतारी वाजवा अन् अहंकारी विचारांना गाडा..#तुतारी वाजवा अन् महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढा..#तुतारी वाजवा अन् स्वराज्य परत आणण्यासाठी लढा.. #तुतारी वाजवा… pic.twitter.com/c0OcjKuFrE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 22, 2024
‘तुतारी’ तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचा लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे. शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढील निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“हा नणंद भावजईचा कौटुंबिक कार्यक्रम नाही’; सुप्रिया सुळेंनी घेतली निवडणूक सिरिअसली
-पवार कुटुंबातील कोणीच अजित पवारांचा प्रचार करणार नाही?; जय पवारांची प्रतिक्रिया
-“बैलगाडा शर्यतीचं काम मी केलं अन् क्रेडीट मात्र…, तिकिटासाठी मी पक्ष बदलत फिरत नाही”
-म्हाडाचे अध्यक्षपद पण लोकसभा उमेदवारीतून आढळरावांचा पत्ता कट???; म्हणाले….