पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटासाठी बारामती मतदारसंघाची निवडणूक अधिक महत्वाची आहे. या निवडणुकीपूर्वीच पवार कुटुंबात मोठा कलह झाला आणि तो चव्हाट्यावरही आला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याच्या तुफान चर्चा आहे.
या चर्चेला खुद्द अजित पवारांनी देखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजई असा लोसकभा निवडणुकीचा सामना पहायला मिळणार आहेत. या सर्व चर्चांवर बोलताना सुप्रिया सुळेंनी बारामती निवडणुकीबाबत भाष्य केले आहे.
‘नणंद भावजय असं तुम्ही बघता, पण हा कौटुंबिक कार्यक्रम नाही. माझी लढाई वैचारिक आहे. माझ्या विरोधात कुणीही उभा राहिलं तरीही त्याच्यासोबत ते म्हणतील ती जागा आणि म्हणतील ती वेळ, त्यावर चर्चा करायला तयार आहे’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“कोण माझ्याविरोधात उभा राहील माहीत नाही. मी तीन निवडणूक लढले. भाषण करायला तुम्ही मला निवडून पाठवले आहे. मी अनेक लोकांची संसदेतील भाषणे ऐकते. सरपंचपासून लोकसभेपर्यत प्रत्येक इलेक्शन सिरियसली घेतले पाहिजे”, असं म्हणत अजित पवारांनी संसदेतील भाषणेबाबत केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पवार कुटुंबातील कोणीच अजित पवारांचा प्रचार करणार नाही?; जय पवारांची प्रतिक्रिया
-“बैलगाडा शर्यतीचं काम मी केलं अन् क्रेडीट मात्र…, तिकिटासाठी मी पक्ष बदलत फिरत नाही”
-म्हाडाचे अध्यक्षपद पण लोकसभा उमेदवारीतून आढळरावांचा पत्ता कट???; म्हणाले….
-पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे, सरकार या संस्कृतीला पाठिंबा देतंय; रविंद्र धंगेकर आक्रमक