पुणे : मणिपाल हॉस्पिटल, खराडीने आज नसांच्या विविध समस्यांनी ग्रासलेल्या लोकांना व्यापक देखभाल प्रदान करण्यासाठी नसांसाठीचे आपले खास क्लिनिक सुरू केले. या क्लिनिकच्या माध्यमातून एकाच छताखाली वेळेवर निदान, प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रगत उपचार प्रदान करण्याचे या हॉस्पिटलचे लक्ष्य आहे. अत्यंत सामान्य, पण बऱ्याचदा दुर्लक्षिल्या जाणाऱ्या आणि त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण करणाऱ्या नसांच्या रोगांच्या बाबतीत जागरूकता आणण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या सहयोगात्मक उपक्रमात व्हास्क्युलर मेडिसीन, व्हास्क्युलर इंटरव्हेन्शनल रेडियोलॉजी, डर्मेटॉलॉजी आणि निदानात्मक रेडियोलॉजी या क्षेत्रातील विशेषज्ञांचे ज्ञान आणि कौशल्य एकत्र आले आहे. ही तज्ज्ञ मंडळी व्हेरीकॉस व्हेन्स, डीप व्हेन थ्रॉम्बॉसिस (DVT), व्हेनस मालफॉर्मेशन, सेंट्रल व्हेन स्टेनॉईसीस / ऑकल्झन, सुपीरियर व्हेना काव्हा सिंड्रोम आणि मे-थर्नर सिंड्रोम यांसारख्या नसांच्या विविध रोगांचे निदान आणि त्यावरील प्रगत आणि कमीत कमी कापाकापी करून करण्याच्या उपचारांच्या बाबतीत अनुभवी आहेत.
हे क्लिनिक सुरू करण्याबद्दल टिप्पणी करताना न्यूरो अँड व्हास्क्युलर इंटरव्हेन्शनल रेडियोलॉजीचे सल्लागार डॉ. संतोष पाटील म्हणाले “नसांच्या समस्यांकडे आणि खास करून व्हेरीकॉस व्हेन्सकडे सामान्यपणे दुर्लक्ष केले जाते आणि त्यांचे निदान देखील केले जात नाही. त्यामुळे त्या रुग्णाचे संभावित आरोग्य समस्येकडे देखील नकळत दुर्लक्ष होते. यापूर्वी त्यावर शस्त्रक्रिया प्रक्रिया हा एकच इलाज होता, पण लेसर थेरपी आणि व्हेनासील ट्रीटमेंट्स सारख्या प्रगतीमुळे आता कमीत कमी कापाकापी असलेले उपाय उपलब्ध आहेत. या प्रक्रियांनंतर रिकव्हरी जलद होते आणि परिणाम उत्तम मिळतात. असे असूनही, लोकांमध्ये या प्रगत उपचार पद्धतींबाबत जागरुकतेचा अभाव असल्याचे दिसून येते.”
“मणिपाल हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्वांना दर्जेदार देखभाल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नरत असतो. आमच्या या नवीन व्हेन क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या प्रदेशातील लोकांना निष्णात सल्लागार आणि उत्कृष्ट वैद्यकीय देखभाल प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. या उपक्रमातून केवळ वैद्यकीय उत्कृष्टतेबाबतची आमची निष्ठाच प्रतिबिंबित होत नाही, तर आमच्या शहरातील लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकण्याची आमची धडपड देखील दिसून येते”, असे मणिपाल हॉस्पिटल, खराडी, पुण्याचे हॉस्पिटल डायरेक्टर परमेश्वर दास म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्यात फडणवीस किंवा कोणी वरिष्ठ नेता ही निवडणूक लढो, जिंकणार मीच’- रविंद्र धंगेकर
-पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणाचे ‘कोडवर्ड’ आले समोर; ‘लंबा बाल’, ‘मुंबई बंदर’ आणि ‘न्यू जॉब पुणे’
-सदाशिव पेठेतील जिममधील सामानाची चोरी; ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी
-पुणे ड्रग्ज कनेक्शन अंडरवर्ल्ड, दुबईत?; पुण्यात बनवलेल्या ड्रग्जची थेट लंडनला विक्री
-शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी; धमकी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी