पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे २ गट झाले. पक्ष कार्यालयावर ताबा, हक्क, पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह अशा गोष्टींवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांमध्ये तुफान वाद झाला. आता पुण्याचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात राहिले. प्रशांत जगताप यांना धमकी दिली असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.
गेल्या चार दिवसांपासून जगताप यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून धमकीचे संदेश पाठविण्यात येत आहेत. मला गेल्या चार दिवसांपासून धमकीचा संदेश अनोळखी मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येत आहे. मी राजकीय परिस्थितीवर टीका केली, तसेच आंदोलन केल्याने मला धमकावले जात आहे. राजकीय भाष्य केल्यास गंभीर परिणाम होतील. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करून धमकी देणाऱ्यास अटक करावी, असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार करत धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचा निकाल देण्यात आल्यानंतर जगताप यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली.
महत्वाच्या बातम्या-
-शिक्षण फक्त दुसरीपर्यंतच मात्र, ५ राज्यातला अट्टल ड्रग्जमाफिया अखेर पोलिसांच्या ताब्यात
-१३६ वर्षांनंतर इतिहास घडला! वारसा आजोबा अन् वडिलांचा आता लेकही बनली ‘फायरमन’
-‘अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं’; अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार
-पुणेकरांनो मिळकतकर भरायला विसरू नका, अन्यथा प्रॉपर्टी होईल जप्त