पुणे : पुणे शहरात तसेच दिल्ली, सांगली, कुरकुंभ एमआयडीसी सारख्या ठिकाणी पुणे पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ही ड्रग्ज मालिका काही संपेना. त्यातच आता याबाबतची महत्वाची माहिती समोर आली आहे. आपली खरी ओळख लपवून वेगवेगळ्या ५ राज्यात ड्रग निर्मिती करणारा फय्याज शेख (रा. वसई, जि. पालघर) अखेर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला. सोलापूर एमडी ड्रग्जप्रकरणी पकडलेला मुख्य सूत्रधार फय्याज शेख हा केवळ दुसरीपर्यंतच शिकलेला आहे.
कारागृहात असताना त्याला भेटलेल्या वेगवेगळ्या गुन्हेगारांच्या मदतीने त्याने ड्रग निर्मितीची माहिती घेतली आणि कालांतराने तो स्वत:च या धंद्यात उतरल्याचं तपासात समोर आलं आहे.
फय्याज हा फक्त दुसरीपर्यंत शिकलेला असून २००० सालापासून ड्रग निर्मितीच्या अवैध व्यवसाया करत आहे. एका गुन्ह्यात त्याला अटक झाली त्यानंतर कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींमार्फत त्याने ड्रग बनवण्याची केमिस्ट्री समजून घेतली. त्यानंतर तो या धंदा करु लागला आणि महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि राजस्थान या ५ राज्यातील ड्रगच्या गुन्ह्यांचा आंतरराज्य सूत्रधार बनला.
कोणाला आपल्या धंद्याची कुणकुण लागू नये म्हणून तो बंद पडलेले कारखाने भाड्याने घेऊन तेथे ड्रग्ज तयार करत होता. त्यासाठी लागणाऱ्या माणासांची जुळवाजुळव, कच्च्या माल उपलब्ध करणे हे सगळं तो सहजपणे सांभाळत होता. दरवेळी तो ड्रग निर्मितीसाठी लागणारे लोक बदलत होता.
नाशिकसह सोलापुरातील चिंचोळी, चंद्रमौळी एमआयडीसीतील ड्रग निर्मिती उघडकीस आल्यानंतर पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र, तो ओळख लपवून राहत असल्याने आणि कोणतीही संपर्काची साधने वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानच होते. मात्र, अखेर कलबुर्गीत तो सोलापूर ग्रामिण पोलिसांच्या हाती लागला.
महत्वाच्या बातम्या-
-१३६ वर्षांनंतर इतिहास घडला! वारसा आजोबा अन् वडिलांचा आता लेकही बनली ‘फायरमन’
-‘अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं’; अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार
-पुणेकरांनो मिळकतकर भरायला विसरू नका, अन्यथा प्रॉपर्टी होईल जप्त
-“अजितदादा भाजपसोबत गेले म्हणून त्यांची व्होट बँक कमी झाली”
-पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीतही; आतापर्यंत २ हजार किलो ड्रग्ज जप्त