पुणे : पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवान भरती प्रक्रियेत १६७ उमेदवारांची निवड झाली आहे. पुणे शहराच्या इतिहासात तब्बल १३६ वर्षांनमतर अग्निशमन दलात प्रथमच महिला ‘फायरमन’ पदी मेघना महेंद्र सपकाळ यांची निवड झाली आहे. मनपा स्थापनेच्या ७४ व्या वर्षी पहिल्यादाच एका महिलेला या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
मेघना सपकाळचे वडील महेंद्र अग्निशमन दलात कार्यरत आहेत. तिचे आजोबा सदाशिव बापूराव सपकाळ अग्निशमन दलात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. अग्निशमन दलातील सेवेची परंपरा सपकाळ कुटुंबात आहे. मेघनाने अग्निशमन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
पुणे महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर मेघनाने अर्ज केला. परीक्षा, तसेच पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या १६७ उमेदवारांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. महापालिकेने निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. मेघना भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झाली. तिने याबाबतचे सर्व प्रशिक्षण चोखपणे केले आणि आज तिच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळालं आहे. अग्निशमन दलात निवड झाल्याने पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी तिचे कौतुक केले.
अग्निशमन दलातील सेवेची सपकाळ कुटुंबाची परंपरा आहे. माझे आजोबा अग्निशमन दलातून निवृत्त झाले. माझे वडील अग्निशमन दलात कार्यरत आहेत. मी आता माझ्या वडिलांबरोबर काम करणार आहे. माझी आई हयात नाही, ती असती तर तिला खूप आनंद झाला असता, असं मेघना सपकाळ म्हणाली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात सध्या २५० जवान आहेत. शहराचा वाढता विस्तार पाहता अग्निशमन दलातील मनुष्यबळ अपुरे होते. महापालिकेने १६७ जवानांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेकडून जवान भरती प्रक्रिया राबविण्यात आली. भरती प्रक्रियेसाठी अग्निशमन अभ्यासक्रम पूर्ण अनिवार्य आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं’; अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार
-पुणेकरांनो मिळकतकर भरायला विसरू नका, अन्यथा प्रॉपर्टी होईल जप्त
-“अजितदादा भाजपसोबत गेले म्हणून त्यांची व्होट बँक कमी झाली”
-पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीतही; आतापर्यंत २ हजार किलो ड्रग्ज जप्त
-पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्जचे सांगली कनेक्शन!; पुणे पोलिसांकडून कसून चौकशी