पुणे : पुण्याला आता वाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्हेगारीचं शहर म्हणून उच्चारलं जात आहे. पुण्यात ड्रग्ज तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं. पुणे शहरात ड्रग्सचा कारखाना दोन दिवसांपूर्वी मिळाला. मिठाच्या पाकिटात भरुन ड्रग्स विकले जात होते.
पुणे पोलीसांकडून या ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे शोधले जात आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचे पाळमुळं शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी दिल्लीत कारवाई केली आहे.
दिल्लीत पुणे पोलिसांनी ४०० किलो ड्रग्स जप्त केले. दिल्लीत जाऊन पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांकडून दिल्लीत पुन्हा ६०० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. मंगळवारी पोलिसांनी दिल्लीत ४०० किलो ड्रग्स जप्त केले होते. त्यानंतर पुणे पोलिसांकडून पुन्हा ६०० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले.
आतापर्यंत पुणे पोलिसांनी जवळपास २ हजार किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. गेल्या ४ दिवसांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत ४ हजार कोटी रुपये किमतींचे ड्रग्स जप्त केले आले. मात्र या प्रकरणाला पुर्णविराम कधी लागणार? आणखी किती ड्रग्जची तक्ररी केली जाणार? हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्जचे सांगली कनेक्शन!; पुणे पोलिसांकडून कसून चौकशी
-लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये ३ नावांची चर्चा; धंगेकरांना उमेदवारी देण्याची समर्थंकांची इच्छा
-अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांसोबत; रोहित पवार म्हणाले, ‘आम्ही…’
-मेधा कुलकर्णींना राज्यसभा दिल्यानंतर भाजपचा आणखीन एक सर्व्हे; कोणाचं नावं आघाडीवर?
-पुणे पोलीस सॅम ब्राऊनच्या शोधात; ३ महिन्यात २ हजार किलो ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट