पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचे येत्या लोकसभा निवडणुकीवर मोठे पडसाद उमटणार आहेत. त्यातच राष्ट्रवादीसाठी सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. याच बारामतीमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ गटाचे बारामतीमधील पक्ष कार्यालय पाहण्यासाठी गेले. यावर आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.
युगेंद्र पवार यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. आज कळतेय ते पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले आहेत. तिथे जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगितले ते बघावे लागेल. अजित पवारांचा निर्णय कुटुंबाला आवडला नसेल तर सामान्य लोकांना कसा आवडेल. त्यामुळे योगेंद्र आज तिथे काय बोलतोय, कसे बोलतोय, कोणाच्या बाजुने बोलतोय हे बोलल्यानंतर सर्व कळेल. आम्ही विचारांचे पक्के आहोत. साहेबांसोबत राहणार आहोत, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांना राजकारणात पदे मिळत गेली. राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री झाले. त्यांची राजकीय प्रगती कुटुंब म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या डोळ्याने बघितली आहे. व्यक्तिगत जीवनातही पवार साहेबांमुळेच राजकीय प्रगती झाल्याचे अजितदादा सांगत आले आहेत. अशा परिस्थिती अजितदादांनी जो निर्णय सत्तेसाठी किंवा कदाचित आपल्यावर काही प्रमाणात कारवाई होऊ नये यासाठी निर्णय घेतला. तर आम्हाला कुटुंब म्हणून आम्हा सर्वांना निर्णय आवडला नाही, असं स्पष्ट रोहित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करायला मला आवडेल. शरद पवार जे सांगतील, त्यानुसार मी काम करणार आहे. मतदारसंघात दौराही करेल असेही युगेंद्र यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
-मेधा कुलकर्णींना राज्यसभा दिल्यानंतर भाजपचा आणखीन एक सर्व्हे; कोणाचं नावं आघाडीवर?
-पुणे पोलीस सॅम ब्राऊनच्या शोधात; ३ महिन्यात २ हजार किलो ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट
-“येणाऱ्या काळात अजित पवार एकटे पडतील, भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवतं”
-पिंपरी महापालिकेच्या बजेटमध्ये या ३ आमदारांना झुकतं माप; चिंचवडच्या पदरी भरीव निधी
-अजित पवारांना मोठा धक्का, सख्या पुतण्याच शरद पवारांसोबत; बारामतीत नेमकं घडतंय काय?