पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसे पक्षात फूट पडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक महत्वाची आहे. अजित पवारांनी महायुतीसोबत गेल्यामुळे पक्षात फूट पडली आणि परिणामी पवार कुटुंबातही मोठी फूट पडल्याचं चित्र दिसत आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पवार कुटुंबातील फुटीबाबत वक्तव्य करत बारामतीमध्ये मतदारांना भावनिक साद घातली. पण आता शरद पवारांनी अजित पवारांना मोठा दक्का दिला आहे. अजित पवारांचा सख्खा पुतण्या शरद पवारांसोबत निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराला उभा राहणार आहे.
२ दिवसांपूर्वी अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितले होते की, ‘माझं कुटुंब सोडून इतर कुणीही माझ्या कुटुंबातील माझा प्रचार करणार नाही’ त्यानंतर काही दिवसांतच अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या शहर कार्यालयाला आज सकाळी भेट दिली आहे.
‘शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित रहावे’ असे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले आहे. एकंदरीत आता युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होत असल्याने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातो.
यावेळी युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना, ‘हे नविन पक्ष कार्यालय पाहता जुन्या पक्ष कार्यालयाची आठवण नक्कीच होते’, असं म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शिवाजीनगर पोलिसांची जबरदस्त कामगिरी; चोरी करुन कोयते बाळगणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
-भाजपचा ‘तो’ प्लॅन सक्सेस! मेधा कुलकर्णींसह राज्यसभेवर चव्हाण, गोपछडेंची बिनविरोध निवड
-पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त
-शिंदेंच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा हुकमी एक्का; मावळच्या मैदानात जोरदार लढत होणार!
-पुणे पोलिसांची आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई; ६०० किलोंचा ड्रग्ज साठा जप्त