पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी काही केल्या थांबायचं नाव घेईना. पोलीस यंत्रणा सर्व स्तरावर शर्तीने प्रयत्न करत आहे. तरीही गुंडगिरी, चोऱ्या माऱ्यांसारखे प्रकार अद्यापही थांबत नाहीत. रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याची घटना शिवाजीनगर परिसरात घडली होती.
या गुन्ह्यातील २ आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन अल्पयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. चंदु नंदू सरोदे (वय-१९ रा. लक्ष्मीनगर, येरवडा), सिद्धेश विश्वास शेंडगे (वय-१८ रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांना अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार हे १४ फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी तक्रारदार यांचा मोबाईल हिसकावून नेला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी ३९२,३४ सह आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलीस अंमलदार प्रविण धडस, सुदाम तायडे, रुपेश वाघमारे यांना आरोपी मनपा येथील ब्रिजखाली येणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या दुचाकीवरुन त्या ठिकाणी आले. त्यांना ताब्यात घेऊन आरोपींकडून गुन्ह्यातील मोबाईल, दोन कोयते, दोन दुचाकी असा एकूण एक लाख २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपचा ‘तो’ प्लॅन सक्सेस! मेधा कुलकर्णींसह राज्यसभेवर चव्हाण, गोपछडेंची बिनविरोध निवड
-पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त
-शिंदेंच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा हुकमी एक्का; मावळच्या मैदानात जोरदार लढत होणार!
-पुणे पोलिसांची आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई; ६०० किलोंचा ड्रग्ज साठा जप्त
-आम्हाला पक्ष, चिन्ह द्यायचं नाही ही एक दडपशाही नाही का? सुप्रिया सुळेंचा भावनिक सवाल