पुणे : राज्यसभेसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही. कोणीही नामांकन मागे न घेतल्याने आणि कोणतेही नवे नामांकन यादीत न आल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ उमेदवारांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. यात भारतीय जनता पक्षाच्यात ३, तर शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी १-१ नेत्याचा समावेश आहे.
महाराष्ट्र
भाजपचे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजीत गोपछडे, शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे या ६ जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपने मेधा कुलकर्णींना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभा खासदराकीची उमेदवारी दिली होती. मेधा कुलकर्णींना उमेदवारी दिली आणि आज त्यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवडही झाली. अशोक चव्हाण हे नुकतेच भाजपमध्ये आले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने लागलीच त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. आणि त्यांचीदेखील राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली आहे.
राजस्थान
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची राजस्थानातून राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय, भाजपचे चुन्नीलाल गरासिया आणि मदन राठोड यांचीही राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने विधानसभा सचिव महावीर प्रसाद शर्मा यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. कुठलेही नवे नामांकन आले नाही. यामुळे हे तीनही नेत्यांची राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. महत्वाची म्हणजे, उच्च सभागृहात बसण्याची सोनिया गांधी यांची पहिलीच वेळ असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त
-शिंदेंच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा हुकमी एक्का; मावळच्या मैदानात जोरदार लढत होणार!
-पुणे पोलिसांची आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई; ६०० किलोंचा ड्रग्ज साठा जप्त
-आम्हाला पक्ष, चिन्ह द्यायचं नाही ही एक दडपशाही नाही का? सुप्रिया सुळेंचा भावनिक सवाल
-लाचप्रकरणी नाव आल्यानंतर मुगुट पाटलांची ‘अभियान’च्या सहायक आयुक्तपदी बदली