पुणे : पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. शहरातील अवैध धंदे, कोयता गँग, मारहाण, बलात्कार, खून, खूनाचा प्रयत्न, त्याचबरोबर शहरातील पब, हॉटेल्ससाठी नवी नियमावली जाहीर करत सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच गेल्या २ दिवसांपासून शहरातील एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांनी जप्त केला आहे. सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी येथील एका कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा मारून ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो पेक्षा अधिकचे एडमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अनेक जण ताब्यात घेतले असून आजवरच्या इतिहासात पुणे पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे.
अनिल साबळे नावाच्या कारखाना मालकाला पोलिसांनी डोंबिवली इथून सकाळी ताब्यात घेतले आहे. कुरकुंभ एमआयडीसीमध्ये यापूर्वी देखील अनेकवेळा अशी छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी किती कंपन्यांमध्ये अशा प्रकराचे बेकायदेशीर ड्रग्ज बनवले जाते हे देखील पोलिसांकडून तपासले जात आहे.
शहरात विविध ठिकाणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांची छापेमारी सुरू आहे. कुरकुंभ येथील कारखाना मालक व केमिकल एक्स्पर्ट पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता पर्यंत तीन कारवाया करुन तब्बल ६०० किलोहून अधिक एमडी जप्त करण्यात आल्याचे पहायला मिळाले आहे.
पोलिसांनी ड्रग फ्री पुणे या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात येते आहे. रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी १० पथके तैनात केली आहेत. या कामात आम्हाला पुणेकरांचे सहकार्य अपेक्षित आहे. ड्रग्जच्या संदर्भात माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. यासाठी आम्ही ८९७५९५३१०० हा मोबाईल क्रमांक देत आहोत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आम्हाला पक्ष, चिन्ह द्यायचं नाही ही एक दडपशाही नाही का? सुप्रिया सुळेंचा भावनिक सवाल
-लाचप्रकरणी नाव आल्यानंतर मुगुट पाटलांची ‘अभियान’च्या सहायक आयुक्तपदी बदली
-पुण्याचा दादा कोण?; रोहित पवारांच्या बॅनरची राजकारणात मोठी चर्चा
-चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल
-प्रशासनराज पुण्यात फेल? ‘सीएमओ’ तक्रारीवर कानउघडणी होताच पालिकेची धावपळ