पुणे : पुणे शहरात गुंडांची दहशत, गुन्हेगारांचा उच्छाद त्यातच पोलिसांचा बेशिस्तपणा या सर्व घटना सुरुच आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून एक लाखांची लाच घेणाऱ्या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. आयुक्त मुगुट पाटील यांचे नाव आल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली होती.
मुगुट पाटील यांची ‘अभियान’च्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर एका फौजदाराला निलंबित करून, सहायक निरीक्षकाला नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले आहे. देहूरोड विभागाचा अतिरिक्त कार्यभार सहायक पोलीस आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
एसीबीने कारवाई केलेल्या प्रकरणात नाव आल्याने मुगुटलाल पाटील यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत देहूरोड पोलीस ठाणे जिल्ह्यात विविध कारणांनी चर्चेत आहे. गुन्हे शाखेने सलग दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापा मारून लोकांना अटक केली होती. तर गांजा बाळगल्याच्या खोट्या गुन्ह्यात एका विद्यार्थ्याला अडकवण्यासाठी त्याचे अपहरण आणि खंडणी मागितल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या २ पोलीस कर्मचाऱ्यांचा या घटनेत सहभागअसल्याचं उघड झाला होता. त्यामुळे त्या दोघांना निलंबित करण्यात आले. मात्र, तपास पथकात कार्यरत असलेले हे दोघे सध्या फरार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याचा दादा कोण?; रोहित पवारांच्या बॅनरची राजकारणात मोठी चर्चा
-चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल
-प्रशासनराज पुण्यात फेल? ‘सीएमओ’ तक्रारीवर कानउघडणी होताच पालिकेची धावपळ
-पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ५५ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त
-पुण्यातील हॉटेल्स आणि पब धिंगाण्याबाबत पोलिसांची नियमावली जाहीर