पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केले आणि समर्थक आमदारांसह महायुतीसोबत सत्ता स्थापन केली. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. यामध्ये दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश आहे.
दिलीप वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे अनेकांचे लक्ष लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बॅनर्सची मोठी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्याचा दादा कोण अशी चर्चा आता बॅनरवर रंगली आहे. या प्रश्नाचं उत्तर आता बॅनर लावत उत्तर दिलं आहे.
‘वादा तोच..! पण.. दादा नवा’ अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या बॅनरमुळे पुणे जिल्ह्यातील मंचरच्या कळंब भागात केलेल्या बॅनरबाजीवरुन अजितदादांची जागा रोहित पवार घेत आहेत का? अशा चर्चा रंगल्या आहेत.
खासदार शरद पवार यांची उद्या मंचर येथे जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेसाठी ‘मी येतोय…’ असा संदेश दिला जात आहे. तर दुसरीकडे ‘वादा तोच..! पण दादा नवा..!’, अशा टँगलाईनचे बॅनर्स झळकल्यामुळे राजकारणात या बॅनर्सची चर्चा जोरदार रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल
-प्रशासनराज पुण्यात फेल? ‘सीएमओ’ तक्रारीवर कानउघडणी होताच पालिकेची धावपळ
-पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ५५ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त
-पुण्यातील हॉटेल्स आणि पब धिंगाण्याबाबत पोलिसांची नियमावली जाहीर
-पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ४ कोटींचे ड्रग्ज जप्त; आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय