पुणे : पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटलं जात. पण आता पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पुण्याचा ‘गुन्हेगारीचा शहर’ म्हटलं जातंय. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे. त्यातच आता चारित्र्यावर संशय घेत महिलेचा खून प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन उंदीर मारण्याचे औषध पाण्यात प्यायला देऊन महिलेचा खूनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू, सासऱ्यांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
हनुमंत अंकुश गिरी असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सासू सरस्वती, सासरे अंकुश, दीर आदित्य (तिघे रा. सुलतानपूर, जि. बीड), नणंद सुजाता प्रल्हाद भारती, शिवाजी भारती (रा. वडवणी, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साक्षी हनुमंत गिरी (वय २३, रा. केसनंद, नगर रस्ता) या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
साक्षीचा ५ वर्षांपूर्वी हनुमंत याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती, सासू, सासरे आणि नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला आहे. साक्षीचा पती हनुमंत कामानिमित्त केसनंद परिसरात स्थायिक झाला होता.
हनुमंतने तिच्या चारित्र्याचा संशय घेतला. उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून साक्षीला देऊन तिचा खूनाचा प्रयत्न केल्याचे साक्षीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक भालेराव तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-प्रशासनराज पुण्यात फेल? ‘सीएमओ’ तक्रारीवर कानउघडणी होताच पालिकेची धावपळ
-पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ५५ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त
-पुण्यातील हॉटेल्स आणि पब धिंगाण्याबाबत पोलिसांची नियमावली जाहीर
-पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ४ कोटींचे ड्रग्ज जप्त; आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय