पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी सर्वासमान्य नागरिक आणि पोलिसांच्या नाकात दम केला आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून अनेक कडक नियम तसेच काही योजना आखल्या जात आहेत. त्यातच आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी मिटवण्यासाठी कंबर कली आहे.
पुणे शहरात पब नाईटलाईफ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पबमधील तरुणांचा हाच रात्रीचा धिंगणा थांबवण्यासाठी अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देण्यात आली आहे. नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.
पोलिसांनी जाहीर केलेली नियमावली काय आहे?
- हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती देणे गरजेचे आहे.
- स्वच्छतागृह वगळून हॉटेलमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे.
- हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे.
- सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे असावेत.
- हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चारित्र्यपडताळणी करावी.
- कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक आहे.
- हॉटेलमध्ये धुम्रपानासाठी (स्मोकिंग झोन) स्वतंत्र जागा असावी.
प्राथमिकरित्या 15 दिवसांसाठी ही नियमावली आहे. त्यावर 15 दिवस नागरिकांच्या हरकती आणि सूचना घेतल्या जाणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यासोबत हुक्का पार्लरवरदेखील पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. येत्या काही दिवसांत कायमची नियमावली जाहीर होणार आहे. पुण्यातील सगळ्यात वाईट आणि अवैध धंदे, पब, नाईटलाईफवर पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ४ कोटींचे ड्रग्ज जप्त; आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय
-पिंपरी-चिंचवडचे सहायक आयुक्त लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात
-पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; परिसरातील गाड्यांची तोडफोड करत कोयते हवेत भिरकावले
-पुण्याची गुन्हेगारी थांबणार कधी?; पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
-‘भाजपला विजयाचा आत्मविश्वास राहिला नाही, नेत्यांमध्ये अहंकार वाढला’; सुप्रिया सुळेंचा आरोप