पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई केली आहे. सोमवार पेठेतील गुंड वैभव माने आणि त्याचे ३ साथीदार अमली पदार्थांची विक्री करत होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणी वैभव उर्फ पिंट्या माने याच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून, अमली पदार्थ तस्करीमागे आंतरराष्ट्रीय तस्कर असल्याचा संशय आहे.
गुंड वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याचे साथीदार अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पवार, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.
पोलीस कर्मचारी विठ्ठल साळुंखे यांनी अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी-चिंचवडचे सहायक आयुक्त लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात
-पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; परिसरातील गाड्यांची तोडफोड करत कोयते हवेत भिरकावले
-पुण्याची गुन्हेगारी थांबणार कधी?; पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
-‘भाजपला विजयाचा आत्मविश्वास राहिला नाही, नेत्यांमध्ये अहंकार वाढला’; सुप्रिया सुळेंचा आरोप
-शिरुरच्या जागेवरून युतीत मिठाचा खडा! आढळरावांनी अजितदादांना ठणकावून सांगितलं