पुणे : राज्यभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील शिवाजीनगर येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरत टीका केली आहे.
‘जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह सगळ्यांची चर्चा रोज असते. तुम्ही विचार केला पाहिजे, २०० आमदार, ३०० खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक हवे आहेत. याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना, आमच्याकडे काही तरी टॅलेंट आहे ना त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना आम्ही छोटे पक्ष राहिलेले आहोत तरी ते प्रयत्न करतात म्हणजे काहीतरी दम आहे ना आमच्यात’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट झाली. या भेटीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पक्ष फोडले, घरं फोडली आणि आता राज ठाकरेंना भेटायला गेले आहेत. म्हणजे भाजपला विजयाचा आत्मविश्वास नसल्याचं दिसून येतं, तुमच्या प्रश्नात उत्तर दडलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
‘सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर आपण निकालावर बोलूच. भाजप नेत्यांमध्ये हा काय अहंकार आहे, हे भाजपचे संस्कार आहेत याचं आश्चर्य आहेत? मी अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज यांच्यात अहंकार नव्हता. एवढा अहंकार भाजपकडे नव्हता, काय झालंय भाजपला?’, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याबद्दल केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिरुरच्या जागेवरून युतीत मिठाचा खडा! आढळरावांनी अजितदादांना ठणकावून सांगितलं
-‘राजकारण म्हणजे भातुकलीचा खेळ नाही, मी कुटुंबात राजकारण आणत नाही’; सुप्रिया सुळेंचा पलटवार
-धक्कादायक! पोलीस स्टेशनसमोर पेटवून घेतलेल्या त्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी
-पुणे लोकसभा उमेदवारीच्या आखाड्यात मुरलीधर मोहोळ बाजी मारणार?