पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये तू-तू मै-मै सुरु आहे. अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत भावनिक आवाहन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. यावरुन आता सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे.
‘मी कुटुंबात कधीही राजकारण आणले नाही. राजकारण हा भातुकलीचा खेळ नाही. नाते आणि कामात मी कधीच गल्लत केली नाही. माझे नाते सुळे, पवार आणि शिंदे कुटुंबीयांपुरते मर्यादित नसून, नागरिकांशीही विश्वासाचे नाते आहे. दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी आहेत. माझी लढाई वैचारिक आहे,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे. राज्यात दोनशे आमदार आणि दिल्लीत तीनशे खासदार असूनही ठोस कामे झाली नाहीत. धनगर, लिंगायत, मुस्लिम, भटक्या समाजांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, त्यांच्या मागण्यांवर अजूनही मार्ग निघालेला नाही, असं सांगत सप्रिया सुळे यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला आहे.
सत्तेत असूनही अनेकांचे प्रश्न न सुटता चिघळले आहेत. या वर्षी राज्यात पाऊसही समाधानकारक झालेला नाही, त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होणार आहे. मी दोन महिन्यांपासून सरकारकडे पाठपुरावा करती आहे, पण त्यांना गांभीर्यच दिसत नाही,’ अशी टीका सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली आहे. दरम्यान, पुणे, नागपूर, आणि मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीवरुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! पोलीस स्टेशनसमोर पेटवून घेतलेल्या त्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी
-पुणे लोकसभा उमेदवारीच्या आखाड्यात मुरलीधर मोहोळ बाजी मारणार?
-खरंच महिला सुरक्षित??? पिस्तुलाचा धाक दाखवत केला बलात्कार
-धक्कादायक! दारुच्या नशेत नराधमानं फुटपाथवरील महिलेवर केला बलात्कार
-पोलीस काढणार गुंडांची ‘डिजीटल कुंडली’; दलात ‘क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट’ची स्थापना