पुणे : पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठलाय. पुणे शहरातील के.के. मार्केट परिसरातील एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरणाला २ दिवसही उलटले नाहीत तोच पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना घडली आहे. पुण्याच्या जंगली महाराज रोडवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डेक्कन पीएमटी बस स्टॉपसमोर गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. मात्र घडलेल्या या प्रकारामुळे महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील डेक्कन हा गजबजलेला परिसर आहे. या परिसरात अनेक रस्त्यावर फुगे वगरे विकणारे लोक फुटपाथवर राहतात.
डेक्कन बस स्टॉपच्या मागील फुटपाथवर राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार लक्षात येताच महिलेने थेट पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरुन गोविंद रामा घारोळे या ३२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही महिला रात्री पीएमटी बस स्टॉप मागील फुटपाथवर झोपल्या होत्या. त्याचवेळी हा नराधम दारुच्या नशेत आला आणि महिलेसोबत जबरदस्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पोलीस काढणार गुंडांची ‘डिजीटल कुंडली’; दलात ‘क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट’ची स्थापना
-स्टंटबाजी करणं दोघांना पडलं महागात; पोलिसांनी ताब्यात घेत केली कायदेशीर कारवाई
-‘मीच एकटा आहे, हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक होणं’; काकांनी सांगितला ‘भावनिक’ शब्दाचा अर्थ