पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी आपल्याला कुटुंबाने एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं. त्यातच त्यांनी कार्यकर्ते आणि श्रोत्यांना भावनिक आवाहन देखील केले. यावेळी बोलताना अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. अजित पवारांच्या भावनिक होण्यावर आणि टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘संपूर्ण लोकं एका कुटुंबाच्या मागे आहेत आणि मीच एकटा आहे, हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक करून त्यांची सहानुभूती मिळवण्याचं काम आहे ‘ अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
“चिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करुन घेतलाय”
राष्ट्रवादी पक्षातील या राजकीय नाट्यमय घडामोडींनतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली. ‘पक्ष, चिन्ह काढून घेणे हा आमच्यावर अन्याय आहे. पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांच्या लोकसभा निवडणुकीबाबत शरद पवार म्हणाले..
‘लोकशाहीत निवडणुकीला उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी अधिकार गाजवत असेल तर तक्रार करण्याची गरज नाही. आपली भूमिका लोकांसमोर मांडावी, आपण काय काम केलं हे सांगितलं पाहिजे. अनेक संस्था आम्ही उभ्या केल्या. ५० वर्षापासूनच्या या संस्था आहेत. आम्ही ज्या काळात या संस्था स्थापन केल्या, त्यावेळी आज आरोप करणाऱ्यांचं काय वय होतं याचं त्यांनी कॅलक्युलेशन करावं. त्याचा विचार करावा. तुम्ही जरूर उभं राहा. तो तुमचा अधिकार आहे’, असं शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-स्वाती मोहोळला धमकावणारा ससूनमधून पळाला होता; मार्शल लीलाकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-पुणे स्टेशन, शिवाजीनगर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात
-भावी अधिकारी पितायत कोट्यावधींचा चहा; सर्वेक्षणातून आली मोठी माहिती समोर
-हडपसरमध्ये रंगला चार दिवसीय राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा ‘महासंग्राम’