पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती सामान्याच्या समारंभाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. हा कुस्ती सामना चार दिवसीय असून या सामन्यासाठी अनेकांनी प्रमुख पाहुणे आपली उपस्थिती दर्शवली आहे. प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन, अप्पर पोलीस अधिक्षक ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, हिंदकेसरी अभिजीत कटके, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चार दिवसीय पार पडत असलेल्या या सामन्यात, राज्यभरातून अनेक मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. लोकाश्रय असणाऱ्या कुस्तीला राजाश्रय मिळवून देण्यासाठी तसेच मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी रांगड्या मातीतील हे सामने आयोजित करण्यात आल्याचे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले आहे.
तब्बल 600 मल्ल या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे संकल्पनेतून, हा कुस्ती सामना आयोजित करण्यात आला आहे. चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही स्पर्धा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, जे. एस. पी. एम. कॉलेज शेजारी, हांडेवाडी,हडपसर पुणे येथे अत्यंत चुरशीची अशी स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडत आहे.
विशेष म्हणजे वियजी मल्लांसाठी ठेवण्यात आलेली, बक्षीसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम ५ लक्ष रुपये , चांदीची गदा व बुलेट मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकास ३ लक्ष व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांकास २ लक्ष व सन्मान चिन्ह व चतुर्थ क्रमांकास १ लक्ष व सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत. तसेच विविध वजनीगटातील स्पर्धकांना 35 लाखांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
दरम्यान,या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार आहे. पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर, बाळासाहेब ढवळे, उद्योगपती बाळासाहेब भानगिरे, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, हरियाणाचे राजू पैलवान, अंकुश मामा घुले ,राजेंद्र जरांडे, मोहन हगवणे, राजेंद्र घुले, नानासाहेब पठारे,मकरंद केदारी,राजेंद्र भानगिरे,निलेश माझीरे,श्रीकांत पुजारी,लक्ष्मण आरडे, अभिजीत बोराटे, सुदर्शना त्रिगुणाईत, श्रद्धा शिंदे, सचिन थोरात, नितीन लगस व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘लोकांपर्यंत चिन्ह पोहचवा, विश्वास द्या यश, नक्की मिळेल’; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
-“आम्ही कोणाचाही पक्ष चोरला नाही, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत”
-मनोज जरांगेंची प्रकृती गंभीर; आक्रमक आंदोलकांकडून पुण्यात ठिकठिकाणी चक्काजाम
-‘घर वडिलांच्या नावावर असताना तुम्ही वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही?’; सुळेंचा दादांना टोला