पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गटांत विभाजन झाले. राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेताला. त्यानंतर अजित पवार यांच्याकडील बहुमतानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यावर हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार केली.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत.या पार्श्वभूमीवर शरद पवार बारामती मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. ‘सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना विश्वास द्या, यश नक्की मिळेल’, अशा सूचना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
‘देशात याआधी असं घडलं नाही की, ज्यांनी पक्ष स्थापन केला. त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतलं. चिन्हाची काळजी करायची गरज नसते. मी ५ वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढलो. वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात पहिल्या. कोणाला वाटत असेल चिन्ह काढून घेतलं पाहिजे म्हणजे संघटनेच अस्तित्व संपेल. मात्र असं कधी होत नसतं’, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“आम्ही कोणाचाही पक्ष चोरला नाही, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत”
-मनोज जरांगेंची प्रकृती गंभीर; आक्रमक आंदोलकांकडून पुण्यात ठिकठिकाणी चक्काजाम
-‘घर वडिलांच्या नावावर असताना तुम्ही वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही?’; सुळेंचा दादांना टोला
-कुलकर्णी राज्यसभेवर तर लोकसभेसाठी मुळीकांच्या आशा पल्लवीत; काय असेल भाजपचा निर्णय?
-लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांची जय्यत तयारी; शहरात फिरु लागला ‘विकासरथ’