पुणे : विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून कसबा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वतीने केला जाणार आहे. यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत २१ रणरागिनींचा सत्कार समारंभ पार पडणार आहे.
गेली अनेक वर्षांपासून मृणालिनी आणि हेमंत रासने यांच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रातील महिलांना गौरवण्यात येते. स्त्री सन्मान गौरव सोहळ्याचे यंदा ७ वे वर्ष असून शनिवार दि १७ फेब्रुवारी २०२४ रोजी नातूबाग मैदान, बाफना पेट्रोलपंप जवळ, बाजीराव रोड, पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यावेळी कसबा मतदारसंघातील जवळपास १२ ते १६ हजारांच्यावर महिला उपस्थित राहणार असल्याची माहिती हेमंत रासने यांनी दिली.
“आजच्या युगामध्ये स्त्रिया या कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या आपला वेगळा ठसा विविध क्षेत्रात उमटवत आहेत. देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी हे नेहमी महिलांच्या सबलीकरणासाठी आग्रही असतात. गेली ७ वर्षांपासून अविरतपणे आपल्या माध्यमातून या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना प्रेरणा मिळेल, त्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हाच उद्देश आहे”, असे हेमंत रासने म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मी मुख्यमंत्रिपदासाठी हापापलेला माणूस नाही; अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य
-“मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही हेच दुर्दैव”; अजित पवार गहिवरले
-“आम्ही कोणाचाही पक्ष चोरला नाही, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत”
-मनोज जरांगेंची प्रकृती गंभीर; आक्रमक आंदोलकांकडून पुण्यात ठिकठिकाणी चक्काजाम
-‘घर वडिलांच्या नावावर असताना तुम्ही वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही?’; सुळेंचा दादांना टोला