पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित बारामतीतील बुथ मेळाव्यात बोलत होते. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा देखील होणार आहे. या सभेत बोलताना त्यांनी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदासाठी ते कधीच हापापले नसल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
मी मुख्यमंत्रिपदासाठी हापापलेला माणूस नाही. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिक जागा येऊनही वरिष्ठांनी उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानले. त्यांचे आदेश शिरसावंद्य मानले. तेव्हाही मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्हतो. तेव्हा आर. आर. पाटील किंवा छगन भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकले असते. कारण ते त्यावेळी राष्ट्रवादीचे मोठे नेते होते. मी २०१० साली उपमुख्यमंत्री झालो”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केले तर आम्ही चांगले आणि मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष झालो तर चोर ठरलो का? म्हणजे वरिष्ठांच्या पोटी आम्ही जन्माला आलो असतो तर आम्ही चांगले. मग अध्यक्षही झालो असतो, पक्षही ताब्यात आला असता. शेवटी सख्या भावाच्याच पोटीच जन्माला आलो ना. म्हणून सांगतो लोकसभा निवडणुकीत काही लोक भावनिक करतील, त्याकडे लक्ष देऊ नका, असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
“आमचे वरिष्ठ शरद पवार मध्यंतरी बोलले मी राजीनामा देतो. आम्ही कुणीही राजीनामा मागितला नव्हता. वरिष्ठांच्या इच्छेनंतर आम्ही सर्व नेते बसून आताच्या खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या इतर नेत्यांना मी विश्वासात घेऊन हे मान्य केलं. पण दोन-तीन दिवसांत काय चक्र फिरली माहीत नाही, ते म्हणाले मीच अध्यक्ष राहतो. आम्ही सातत्याने वरिष्ठांना सांगत होतो की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बहुमत राहिले नाही तर आपण देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देऊ. पण त्यालाही विलंब झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले”, असं सगळं सांगत अजित पवारांनी राजकारणात झालेला सत्तापालटाचा क्रम सांगितला.
महत्वाच्या बातम्या-
-“मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही हेच दुर्दैव”; अजित पवार गहिवरले
-“आम्ही कोणाचाही पक्ष चोरला नाही, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत”
-मनोज जरांगेंची प्रकृती गंभीर; आक्रमक आंदोलकांकडून पुण्यात ठिकठिकाणी चक्काजाम
-‘घर वडिलांच्या नावावर असताना तुम्ही वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही?’; सुळेंचा दादांना टोला
-कुलकर्णी राज्यसभेवर तर लोकसभेसाठी मुळीकांच्या आशा पल्लवीत; काय असेल भाजपचा निर्णय?