पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा देखील होणार आहे. या सभेत बोलताना त्यांनी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टीका करताना गहिवरुन आलं.
‘आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं. पक्ष मला मिळाला असता. खरंतर मी सख्ख्या भावाचाच मुलगा होतो ना? मग मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही, हे आमचे दुर्दैव. आम्हाला सांगितलं गेलं की, त्यांच्या मुलीला राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आहे, आम्ही मान्य केले. काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यात आला असता, असं म्हणत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गहिवरुन आलं होतं.
‘वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला. अरे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. आम्ही आमची बाजू मांडली. जो व्हीप द्यायचा आहे तो आमच्या बरोबर आहे. उगीच आमची बदनामी का करता’, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार गटावर टीका केली आहे.
‘आता आमच्या कुटुंबातील वरिष्ठांसह मी आणि माझा परिवार वगळता कुटुंबातील सारे जण माझ्या विरोधात प्रचार करणार आहेत. तुम्ही भावनिक होऊ नका, मला एकटे पाडायचे काम सुरू आहे’, असे म्हणताना अजित पवारांना गहिवरून आले.
‘मी काम करतो. मला कामाची आवड आहे. मला सेल्फी काढायची सवय नाही. पण अलीकडे काही जण फोन करू लागले आहेत, कसे काय, पाणी आहे का? आता हा काय प्रश्न झाला का? लोकसंपर्क आता त्यांना सुचत आहे’, असं म्हणत अजित पवारांना सुप्रिया सुळेंना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“आम्ही कोणाचाही पक्ष चोरला नाही, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत”
-मनोज जरांगेंची प्रकृती गंभीर; आक्रमक आंदोलकांकडून पुण्यात ठिकठिकाणी चक्काजाम
-‘घर वडिलांच्या नावावर असताना तुम्ही वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही?’; सुळेंचा दादांना टोला
-कुलकर्णी राज्यसभेवर तर लोकसभेसाठी मुळीकांच्या आशा पल्लवीत; काय असेल भाजपचा निर्णय?
-लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांची जय्यत तयारी; शहरात फिरु लागला ‘विकासरथ’