पुणे : गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याचं पाहूनही राज्य सरकार जरांगेंच्या जीवाची पर्वा करेना, हे पाहून मराठा समाज अधिक आक्रमक होत आहे.
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समजाचे आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात सकल मराठा समाज आंदोलन करत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच नाही तर पुणे शहरात ठीक ठिकाणी आज सकाळपासून मराठा समजाला आरक्षण मिळवण्यासाठी सुरू आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये देखील याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पिंपरी चिंचवडचे प्रवेशद्वार असणाऱ्या किवळेमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले. मुकाई चौकालगत त्यांनी रस्त्यावर बसून राज्य सरकारचा निषेध केला आहे. ‘सरकारने असाच कानाडोळा केला तर मराठा समाज आणखी आक्रमक होईल’, असा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला आहे.
मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मराठा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. रस्ता रोकोची परवानगी नाकारल्याने वाघोली परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने वाघोली पोलीस चौकीतच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘घर वडिलांच्या नावावर असताना तुम्ही वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही?’; सुळेंचा दादांना टोला
-कुलकर्णी राज्यसभेवर तर लोकसभेसाठी मुळीकांच्या आशा पल्लवीत; काय असेल भाजपचा निर्णय?
-लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांची जय्यत तयारी; शहरात फिरु लागला ‘विकासरथ’
-‘संघर्षाच्या वेळी त्यांची आठवण येते’; आर. आर. आबांच्या स्मृतीदिनी सुप्रिया सुळे भावूक
-मेधा कुलकर्णींच्या राज्यसभेमुळे मोहोळांचा मार्ग मोकळा, नेमकं गणित काय?