पुणे : पुणे पोलिसांमध्ये बेशिस्तपणा असल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत आहेत. त्यातच आता देहूरोड येथिल पोलिसांनी एका तरुणाला धमकी देत पैसे उकाळ्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देत पाच लाख रुपये उकळणाऱ्या देहूरोड पोलीस ठाण्यातील २ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
फिर्यादी मनीषकुमार सिंग चौहान (वय १९, रा. किवळे, पुणे. मूळ रा. झारखंड) हा किवळे येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मनीषकुमार महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतो. देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार आणि अन्य आरोपींनी मिळून त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपींनी १० फेब्रुवारी रोजी दुपारी किवळे येथील एका कॅफेमधून त्याचे अपहरण केले. तेथून मायाज लॉज, गहुंजे स्टेडियम आणि तेथून देहूरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले, असे मनीषकुमारने नोंदविलेल्या फिर्यादीमध्ये सांगितले आहे.
चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देण्यात आली. हा सगळा प्रकार टाळायचा असेल तर २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पोलिसांसह आरोपींच्या धमकीला घाबरलेल्या चौहानने गुगल पे आणि नेट बँकिंगद्वारे आरोपींना चार लाख ९८ हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
मात्र, याप्रकरणी अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा यांना अटक केली आहे. तर, पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळसह शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे तपास करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे पैसा आणि दबावतंत्र; रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप
-स्वयंघोषित स्टंटाबाजाचा व्हिडीओ व्हायरल; वाहतूक पोलिसांकडून शोध सुरु
-आदर पुनावाला यांना भारतरत्नही द्यावा; शरद पवारांचं केंद्राला आवाहन
-बापाने घेतलेल्या पैशाची वसूली अल्पवयीन मुलीकडून; १५ दिवस लॉजवर डांबून गिऱ्हाईकं पाठवलं
-पुण्यात बॅनर: सुप्रिया सुळेंनंतर आता जयंत पाटलांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख