पुणे : उपुमख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदार, नेत्यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार टीका केली जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील टीका केली आहे.
पुण्यातील आंबेगाव इथं नुकसान भरपाई मिळावी. यासाठी आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधव उपोषणाला बसले. त्यांना भेटण्यासाठी आमदार रोहित पवार हे आले होते. त्यावेळी ते माध्यांमासोबत बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गरळ ओकली आहे.
आणखी काही नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप करत आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, जे लोक त्यांच्या विचारांना बांधील नाहीत ते सर्व भाजपा सोबत जातील. ज्यांनी चुका केल्यात ते भाजपसोबत जातील. जे दोन गट भाजप सोबत गेलेत. त्यांना विधानसभेला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवाव्या लागतील, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
मंचर इथं २१ फेब्रुवारी रोजी आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थित होणाऱ्या सभेच्या नियोजनाबाबत खेड-आंबेगाव भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली… यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे उपस्थित होते. @NCPspeaks… pic.twitter.com/aS1yHC9dPy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 15, 2024
सत्तेत असणारे नेते आणि खास करून भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे पैसा आणि दबावतंत्र आहे. काँग्रेसचे एक नेते आता भाजपमध्ये गेले आहेत आणि आणखीन काँग्रेस मधील नेते आमदार भाजपमध्ये जातील. त्याची वेगवेगळी कारणं असू शकतील. भाजपकडून पक्षात घेण्यासाठी अनेक लोकांना संपर्क केला जात आहे. मात्र जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला बांधील आहेत ते त्या ठिकाणी राहतील, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
ते कोणाला भाजपमध्ये बोलवितात हे मला सांगता येणार नाही. स्वाभिमानी मराठी माणसं अजून सुद्धा भाजप सोडून इतर पक्षात आहेत. भाजपचा आणि स्वभिमांनाचा दूर दूर पर्यंत संबध येत नाही. आज पवारसाहेबां सोबत जे लोक आहेत. ते कोणीही भाजपमध्ये जाणार नाही, याचे आश्वासन देतो, असा शब्दही रोहित पवार यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वयंघोषित स्टंटाबाजाचा व्हिडीओ व्हायरल; वाहतूक पोलिसांकडून शोध सुरु
-आदर पुनावाला यांना भारतरत्नही द्यावा; शरद पवारांचं केंद्राला आवाहन
-बापाने घेतलेल्या पैशाची वसूली अल्पवयीन मुलीकडून; १५ दिवस लॉजवर डांबून गिऱ्हाईकं पाठवलं
-पुण्यात बॅनर: सुप्रिया सुळेंनंतर आता जयंत पाटलांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख
-गुंडगिरीची हद्द पार; कैद गुंडांकडून येवरड्यातील जेलरला मारहाण