पुणे : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करत असतात. काहींना आपला छंद म्हणून तर काहींना लोकांचे मनोरंजन करायचे म्हणून सोशल मीडियाचा वापर करतात. मात्र या प्रसिद्धी मिळवणं काहींना चांगलंच महागात पडत असतं. काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. प्रसिद्धी झोतात येण्याच्या नादात स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ शेअर करताना त्यांना त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचंही भान राहत नाही. आणि मग कायदेशीर कारवायांना सामोरं जावं लागतं.
पिंपरी चिंचवड परिसरातील एका स्टंटबाजाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून या तरुणाने व्हिडीओ शूट केला आहे. या स्टंटबाज तरुणाचा सध्या वाहतूक पोलीस शोध घेत आहेत. त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जीवावर बेतेल अशा पद्धतीने धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून तरुण स्टंटबाजी करतो आहे. हा व्हिडीओ पिंपरी-चिंचवड शहरातील असून तरुणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होऊ लागली आहे.
असे रिल्स बनवताना अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. कधी कारमध्ये तर कधी बाईकरुन असे रिल्स तयार केल्याचे नेहमी पहायला मिळते. या रिल्समुळे जीव जाण्याची शक्यता असते. आता अशाच रिल्सवर कारवाई होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या रिल्सस्टार किंवा स्वघोषित स्टंटबाजांवर करडी नजर असणार आहे. अशा पद्धतीने कोणीही स्टंटबाजी करू नये, असं आवाहन ही पोलिसांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आदर पुनावाला यांना भारतरत्नही द्यावा; शरद पवारांचं केंद्राला आवाहन
-बापाने घेतलेल्या पैशाची वसूली अल्पवयीन मुलीकडून; १५ दिवस लॉजवर डांबून गिऱ्हाईकं पाठवलं
-पुण्यात बॅनर: सुप्रिया सुळेंनंतर आता जयंत पाटलांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख
-गुंडगिरीची हद्द पार; कैद गुंडांकडून येवरड्यातील जेलरला मारहाण
-अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सिव्हील इंजिनिअरसह दोघांना अटक