पुणे : पुणे शहर आता गुन्हेगारीचं शहर ठरत आहे. पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. दिवसाढवळ्या खून, मारामारी, दहशत परवणे, कोयता गँगचे थरारक व्हिडीओ देखील समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातील के.के. मार्केट परिसरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आजारपणासाठी घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून एका आरोपी दापत्याने मुलीला पळवून नेलं आणि के.के. मार्केटजवळील एका लॉजवर डांबून ठेवलं आणि तिच्यावर लैंगिक छळ केला. पती-पत्नीच्या या कृत्याने पुणे चांगलंच हादरुन गेलं आहे.
आरोपी असलेल्या पती-पत्नीक़डून पीडितेच्या वडिलांनी साधारण ३० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, त्यांना पैसे परत करता आले नाहीत. हे पैसे वसूल करण्यासाठी आरोपी पती-पत्नीने मुलीसोबत गैरकृत्य केले आहे. यावरच तो आरोपी थांबला नाही. तर आपल्या पत्नीच्या साथीने त्या मुलीला लॉजवर वेश्या व्यावसायही केला.
वडिलांनी घेतलेले उसने पैसे परत न दिल्याने त्यांच्या अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचे,तिला देहविक्री करण्यास भाग पाडल्याचे प्रकरण माध्यमाद्वारे समोर आले आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पुणे पोलिसांकडून याबाबत अहवाल मागवला आहे. याप्रकरणी… pic.twitter.com/yvXy7mwRRP
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 15, 2024
आरोपींनी मुलीला जबरदस्तीने पळवून नेत तिला के.के.मार्केट येथील एका लॉजमध्ये १० ते १५ दिवस डांबून ठेवलं. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा सगळा प्रकार आरोपीच्या पत्नीला माहिती असूनही मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
‘माझे पैसे दे, नाही दिले तर कुठूनही वसूल करुन दे, तुला सोडणार नाही’ अशी दमदाटी केली. त्यानंतर मात्र या आरोपीने आपली हद्द पार केली. लॉजवर राहायला येणाऱ्या ग्राहकाकडून पैसे घेवून वेश्याव्यवसाय करायला भाग पाडला. लॉजमध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्याने विचारणा केली आणि ज्यांनी होकार दिला त्यांच्याकडून पैसे घेत थेट मुलीच्या खोलीत पाठवून अत्याचार करायला सांगितला.
अल्पवयीन मुलीला १५ दिवस लॉजवर डांबून ठेवलं. तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पोक्सो आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेला अटक केली असून आरोपी पती फरार झाला आहे. पुनम आकाश माने आणि पती आकाश सुरेश माने अशी आरोपींची नाव आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात बॅनर: सुप्रिया सुळेंनंतर आता जयंत पाटलांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख
-गुंडगिरीची हद्द पार; कैद गुंडांकडून येवरड्यातील जेलरला मारहाण
-अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सिव्हील इंजिनिअरसह दोघांना अटक
-पुणे पोलीस दलात बेशिस्तपणा; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा मोठा निर्णय
-महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची जगदीश मुळीकांनी घेतली भेट; शहरातील प्रश्नांसंदर्भात चर्चा