पुणे : पुण्यात अनेकदा राजकीय नेत्यांचे बॅनर वॉर पहायला मिळते. बॅनर वॉर हा पुणेरी पाट्यांसारखाच प्रचंड चर्चेचा विषय आहे. पुणे शहरात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शरद पवार यांचे गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात ‘महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री’ असे लिहत शुभेच्छा दिल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी आता जयंत पाटील यांना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यांना भावी मुख्यमंत्री करत आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जयंत पाटील यांचा जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर पुण्यात लावण्यात आले आहेत. जयंत पाटील, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो बॅनर्सवर आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारी विकास चव्हाण यांनी हे बॅनर्स लावले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुणे शहरातील सातारा रस्त्यावर बॅनर्स लावले आहेत. त्यावर जयंत पाटील यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गुंडगिरीची हद्द पार; कैद गुंडांकडून येवरड्यातील जेलरला मारहाण
-अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सिव्हील इंजिनिअरसह दोघांना अटक
-पुणे पोलीस दलात बेशिस्तपणा; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा मोठा निर्णय
-महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची जगदीश मुळीकांनी घेतली भेट; शहरातील प्रश्नांसंदर्भात चर्चा