पुणे : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माजी आमदार आणि भाजपचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी भेट घेऊन पुणे शहरातील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. पुणे शहराचा विकास आराखडा अंमलबजावण्याची सद्यस्थिती आणि पुढील नियोजन, गणेश खिंड रस्त्यासह शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाय योजना, मुळा मुठा नदी शुद्धीकरण आणि नदी काठ सुशोभीकरण सद्यस्थिती नदीपात्र आणि विविध भागातील तलावांमध्ये जलपर्णी वाढल्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली डासांची समस्या आणि उपाय योजना या विषयांवर चर्चा केली.
यावेळी डासांच्या समस्यांवर एका आठवड्यात उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. शहराच्या विविध भागात डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. नदीची आस्वच्छ्ता आणि वाढत्या जलपर्णीमुळे ही समस्या झाली आहे. खराडी येथील जलपर्णी काढण्याचे काम प्राधान्याने हाती घेणार आहे. तसेच मुला मुठा नदी आणि शहरातील तलावांतील जलपर्णी काढण्याचे काम वेगात करणार आहे.
नुकतेच जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने पुणे व्हिजन ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींनी मार्गदर्शन केले. या परिषदेत पुढील काही विषयांमध्ये तातडीने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आल्याचं जगदीश मुळीक म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-नेता ते अभिनेता! अभिजीत बिचुकले लवकरच झळकणार चित्रपटात
-राग गेला, रुसवा हटला! राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?
-रोहित रावसाहेब नरसिंगे दिग्दर्शित ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
-शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला पुर्णविराम; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
-‘शरद पवार’ गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत पुण्यात बैठक; अनिल देखमुखांची प्रतिक्रिया