पुणे : आमदारकीपासून राष्ट्रपती पदापर्यंत निवडणूक लढवण्यासाठी चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले हे एक कलाकार देखील आहे. बिग बॉस फेम या रिअॅलीटी शोमधून देखील बिचुकले हे घराघरांत पोहचलेलं व्यक्तीमत्व आहेत. आज व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून अभिजीत बिचुकले यांचे “तुझ्या विना करमत नाही” हे रोमँटिक गाणे आज प्रदर्शित करण्यात आले.
व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत हे गाणे रिलीज करण्यात आले, यावेळी आपण लवकरच चित्रपटातून झळकणार असल्याची माहिती बिचुकले यांनी दिली आहे. “मला लहानपणापासून कलेची आवड होती मी कविता देखील केलेल्या आहेत. माझ्यातील कलावंत मला पुढे आणायचा असून कला क्षेत्रात देखील मी सुप्रसिद्ध होणार” असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.
यावेळी या गीताच्या पोस्टरचे अनावरण सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आण्णा मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोककलावंत अमर पुणेकर, दिग्दर्शक आंनद सरवदे, संदीप कवडे, राहुल कांबळे, श्रीनिवास वाघ यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-राग गेला, रुसवा हटला! राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?
-रोहित रावसाहेब नरसिंगे दिग्दर्शित ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
-शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला पुर्णविराम; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
-‘शरद पवार’ गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत पुण्यात बैठक; अनिल देखमुखांची प्रतिक्रिया
-Big Breaking | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील या ३ नावांवर शिक्कामोर्तब