पुणे : प्रेम करणाऱ्यांचा खास दिवस असलेल्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित आज झाला आहे. तगडी स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून,रहस्यमय आणि रंजक असा हा टीझर आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. टीझरच्या सुरुवातीलाच आश्विनी कुलकर्णी आणि संजय खापरे हे पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहेत.
गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स अन्ड एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे फैरोज अनवर माजगावकर, हुसैन निराळे, श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून अनिल वहाने आणि सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाचे निर्मात्ये आहेत.
रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद अजित दिलीप पाटील यांनी लिहिली असून पटकथा याची देखील जबाबदारी रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी निभावली. अभिनेता संजय खापरे, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, अभिनेता अरुण कदम, अभिनेता अभिजित चव्हाण, अभिनेता फैरोज माजगावकर, अभीनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसेल. साई पियुष, एलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे.
टीझर मधून हा चित्रपट सीरियल किलर या विषयावर असल्याचा अंदाज येत आहे. तसंच चित्रपटात आई मुलाच प्रेम देखील दिसून येत आहे. चित्रपटाचा लुक देखील फ्रेश दिसत आहे मात्र चित्रपटाच्या कथेत काय रहस्य दडल आहे? हे चित्रपट प्रत्यक्षात पहिल्यासच समजेल म्हणून चित्रपटाची उत्सुकता वाढत जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला पुर्णविराम; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
-‘शरद पवार’ गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत पुण्यात बैठक; अनिल देखमुखांची प्रतिक्रिया
-Big Breaking | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील या ३ नावांवर शिक्कामोर्तब
-राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन???
-२०१९ला विधानसभेत मेधा कुलकर्णींना नाकारलं आता जाणार थेट राज्यसभेत??