पुणे : या महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील ३ नेत्यांनाची उमेदवारीसाठी नावे निश्चित केली आहेत. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते अशोक चव्हाण, कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे नेते डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
नुकतीच भाजपकडून याबाबतची अधिकृत यादी जाहीर केली आहे. अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा झाली होती. याबाबत आज भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आली.
BJP releases another list of candidates for the Rajya Sabha Biennial elections.
Party president JP Nadda from Gujarat
Ashok Chavan, Medha Kulkarni from Maharashtra pic.twitter.com/eIZXmvyjcn— ANI (@ANI) February 14, 2024
मेधा कुलकर्णी यांना २०१९ मध्ये आमदारकीचे तिकीट नाकारुन चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुडमधून आमदारकीसाठी उतरवले होते. यावरुन मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या होत्या. त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली होती. आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपने मेधा कुलकर्णींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसत आहे.
डॉ. अजित माधवराव गोपछडे हे मूळचे नांदेड येथील आहेत. लिंगायत ओबीसी असमार्या अजित गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केलेय. त्याशिवाय ते कारसेवक आहेत. सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन???
-२०१९ला विधानसभेत मेधा कुलकर्णींना नाकारलं आता जाणार थेट राज्यसभेत??
-डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनवणी लवकरच होणार; सीबीआयचा युक्तीवाद संपला
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी फरार; दोन पोलीसांचे निलंबन
-पुण्यात चित्रकला स्पर्धेचे आयोजन; दीपक मानकरांनी गायला पोवाडा