पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्ष करताना दिसत आहेत. विविध कार्यक्रम, मतदारसंघांना भेटी, विकासकामांचे पायाभरणी, उद्घाटन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकसभेची तयारी सुरु आहे. त्यातच या महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय समिकरणांवरुन राज्यसभेच्या एकूण ६ जागांपैकी ३ जागा भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र देशातील इतर राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावे भाजपकडून जाहीर करण्यात आली असली तरी महाराष्ट्रातील उमेदवारांची नावांवर शिक्कामोर्तब झालेला नाही.
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून मेधा कुलकर्णी आणि विश्वास पाठक यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजपने पक्षातील पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांच्यासह आठ जणांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले असून या उमेदवारांनी कागदपत्रे तयार करण्याची लगबग सुरू केलेली आहे.
राज्यसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून भाजपकडून विनोद तावडे, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, हर्षवर्धन पाटील, माधव भांडारी, अमरिश पटेल आणि विजया रहाटकर या नेत्यांचे अर्ज तयार करण्याचे काम सुरू केलं आहे. यांपैकी अंतिम उमेदवार कोण हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निश्चित होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
मेधा कुलकर्णी यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारून मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना येथील ब्राह्मण समाजामध्ये आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले असल्याचे बोलले जात आहे. मात्र याचा अंतिम निर्णय १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनवणी लवकरच होणार; सीबीआयचा युक्तीवाद संपला
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी फरार; दोन पोलीसांचे निलंबन
-पुण्यात चित्रकला स्पर्धेचे आयोजन; दीपक मानकरांनी गायला पोवाडा
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैद धंद्यांवर करडी नजर; गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
-योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा अजित पवारांनी घेतला समाचार; म्हणाले…