पुणे : पुण्यातील गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळला धमकी देणाऱ्या मार्शल लीलाकर (रा. आकुर्डी) याला पोलिसांनी काही दिवसांपुर्वी अटक केली होती. मात्र त्यानंतर त्याची प्रकृती खराब झाल्याने लीलाकरला ससून रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्यावेळी मार्शल लीलाकरने पोलिसांच्या हातावर तुरी देत रुग्णालयातून पळाला.
ससून रुग्णालयातून आरोपी पसार झाल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यातील २ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस शिपाई निखिल अरविंद पासलकर, पोलीस शिपाई पोपट कालूसिंग खाडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिला धमकी दिल्याप्रकरणी मार्शल लीलाकर याला अटक करण्यात आली होती. मार्शलने समाजमाध्यमात स्वाती यांना धमकी देणारा व्हिडीओ प्रसारित केली होती. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून मार्शलला अटक केली होती.
न्यायालयाने लीलाकरला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले होते. फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कोठडीत मार्शल लीलाकरला ठेवण्यात आले होते. रविवारी पहाटे छातीत दुखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पासलकर आणि खाडे त्याला घेऊन ससून रूग्णालयात गेले होते. रुग्णालयातून घेऊन गेलेल्या पोलिसांना गुंगारा गेत मार्शल ससूनमधून फरार झाला. यावरुन या २ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात चित्रकला स्पर्धेचे आयोजन; दीपक मानकरांनी गायला पोवाडा
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैद धंद्यांवर करडी नजर; गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
-योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा अजित पवारांनी घेतला समाचार; म्हणाले…
-सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करुन नाही म्हणून तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून
-मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उद्या पिंपरी-चिंचवड बंद!