पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंती निमित्त दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे यांच्याकडून भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजोन केले आहे. या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे सुरूवातीला दीपक मानकर यांनी स्वतः पोवाडा सादर केला. तसेच छत्रपती शिवरायांचे सुंदर चित्र देखील काढले आणि मग स्पर्धेला सुरुवात झाली.
या स्पर्धेमध्ये रंग आणि रेषांच्या अनोख्या दुनियेत मुलं हरवून गेली. एका अनोख्या आणि रंगतदार वातावरणात आजची चित्रकला स्पर्धा भव्य स्वरूपात पार पडली. मुलांच्या उदंड प्रतिसादाने स्पर्धेला भरगोस यश लाभले. मुलांचा उत्साह तर शब्दांत वर्णन करण्याच्या पलीकडचा होता आणि शिक्षकांनीही स्पर्धेचे उत्तम संयोजन केले होते. दोन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
धनकवडी, आंबेगाव, कात्रज परिसरातील २४ शाळांमधील १३४० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. मुलांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांवरील असणारे प्रेम आदर हे त्यांच्या ड्रॉइंग पेपरवर दिसत होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. आपल्याला या अस्मितेचा सार्थ अभिमान आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणी प्रमाणे कार्यरत असतो’, आमदार भीमराव तापकीर यांनीअसे सांगितले.
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तम बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येणार आहे. स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व रोख १ लाख एक हजार रुपयाची बक्षीस दिली जाणार आहे. हे बक्षीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
आभार प्रदर्शन माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी केले. याप्रसंगी दीपक मानकर यांच्यासह दत्ताभाऊ धनकवडे, माजी नगरसेवक दत्ता सागरे, सचिन डिंबळे, शंकर कडू, किशोर आवाळे, मधुकर कोंढरे, अनिल आवटी, मयूर संचेती, अभिराज रेणुसे, संदीप फडके , मंगेश साळुंखे, राजेंद्र बर्गे, आकाश वाडघरे, रूपाली मालुसरे, राजश्री निंगुने, स्पर्धाप्रमुख सुनील सोनवणे, संदीप भोसले,अक्षय लिम्हण , मनोज तोडकर, शिरीष चव्हाण व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैद धंद्यांवर करडी नजर; गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
-योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा अजित पवारांनी घेतला समाचार; म्हणाले…
-सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करुन नाही म्हणून तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून
-मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उद्या पिंपरी-चिंचवड बंद!
-लेकीसाठी बापाचा पुढाकार; शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत तळ ठोकणार