पुणे : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने अवैध दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने मोठी पावलं उचलली आहेत. जिल्ह्यातील सहा गावात छापे टाकत ९९५ लीटर गावठी हातभट्टी दारूसह ७ लाख ९० हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद धंद्यांवर करडी नजर ठेवून बनावट दारुविरोधात मोहीम राबवली आहे. राज्य शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. भरारी पथकाने गेल्या दोन दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी आणि आंबळे या ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली आहे.
या कारवाईत ५ वारस आणि ३ बेवारस अशा ८ गुन्ह्यांची नोंद करून ९९५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २५ हजार लिटर रसायण, ३ दुचाकी वाहने आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्याची कारवाई सुरू आहे. या पुढेही पुणे विभागाचे राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार अशा प्रकारच्या मोहिमा आखून अवैध दारू व्यवसायावर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा अजित पवारांनी घेतला समाचार; म्हणाले…
-सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करुन नाही म्हणून तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून
-मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उद्या पिंपरी-चिंचवड बंद!
-लेकीसाठी बापाचा पुढाकार; शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत तळ ठोकणार
-लोकसभा निवडणुकीसाठी मनसे जय्यत तयारी; राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर