पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने जारी केलेल्या मसुद्याचे सगेसोयऱ्यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या १४ फेब्रुवारी पिंपरी-चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील विविध आंदोलने करत आहेत.
जानेवारीत लाखो सहकाऱ्यांसह जरांगे मुंबईच्या दिशेने धडकले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन स्थगित केले होते.
राज्य शासनाने जारी केलेल्या मसुद्याचे सगेसोयऱ्यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर करणे, अंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी जरांगे हे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून १४ फेब्रुवारी बंदची हाक दिली आहे. शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लेकीसाठी बापाचा पुढाकार; शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत तळ ठोकणार
-लोकसभा निवडणुकीसाठी मनसे जय्यत तयारी; राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर
-वृक्षरोपणाला जागा नाही तरीही पुणे महापालिका लावणार ५ कोटी रुपयांची झाडे
-कोणाच्या घशात जाण्याअगोदर खडकवासल्याच्या ऑक्सिजन पार्कचं काम सुरु- चंद्रकांत पाटील
-योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा प्रशांत महाराजांकडून निषेध; म्हणाले…