पुणे : राज्यात लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत. त्यातच आता भाजपने पुणे मतदारसंघासाठी आपली ताकद पणाला लावत आहे. भाजपमधून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह सुनील देवधर यांचे नावे प्रामुख्याने पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी चर्चेत आहे.
भाजपच्या या तिन्ही नेत्यांमध्ये जनसंपर्क वाढवण्यासाठी सध्या कार्यक्रमाचे वॉर सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, एकीकडे जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यक्रमाला भाजप नेते हजेरी लावताना दिसत आहेत तर दुसरीकडे देवधर मात्र एकाकी पडल्याचे चित्र पहायला आहे.
श्रीराम मंदिराच्या स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी ‘नमो पुणे अभिवादन’ या भव्य बाईक रॅलीचे आयोजन सुनील देवधर यांनी केले होते. पण याच आयोजनापासून स्थानिक भाजप नेत्यांनी देवधर यांच्यापासून लांब राहणं पसंत केलं आहे.
सुनील देवधर यांच्याकडून मागील काही काळापासून सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे यांचं आयोजन केलं जात आहे. या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी ‘नमो पुणे अभिवादन’ या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
महत्वाच्या बातम्या-
-टिईटी घोटाळ्यातील आरोपीचे एक कोटिचे दागिने न्यायालयाकडून परत!!
-सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
-अयोध्येतील राम मंदिरानंतर लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदीर; फडणवीसांचा विश्वास
-‘आधी साधी विचारपूस पण केली नव्हती आता मात्र…’; अजित पवारांची बोचरी टीका
-“ज्यांनी पक्ष उभारला त्यांच्याकडून काढला अन् दुसऱ्याला दिला असं देशात कधीच घडलं नव्हतं”