पुणे : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सायबर क्राईम पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले होते. तत्कालीन शिक्षण आयुक्त तुकाराम सुपेंकडे तब्बल पावणेचार कोटींची रोख रक्कम व ऐवज सापडला होता. पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने याच प्रकरणात आरोपी असलेल्या अश्विन कुमार याच्या कर्नाटक राज्यातील बंगळुरूतील घरातून सुमारे २४ किलो चांदी, २ किलो सोनं आणि हिरे जप्त केले होते. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा अश्विन कुमार हा प्रमुख आहे.
पुणे येथील टिईटी परिक्षा घोटाळ्यातील अश्वीन कुमार वय- ४४ रा. बेंगळुरू कर्नाटक याला पुणे येथील सायबर क्राईम पोलिसांनी दि. २०/१२/२०२१ रोजी टिईटी परिक्षा घोटाळा प्रकरणी अटक केली होती. पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अश्वीन कुमारला सशर्त जामीन मंजूर केला होता.
सध्या आरोपी अश्विन कुमार जामीनावर मुक्त आहे. सदर गुन्ह्याचा तपास होऊन पुणे न्यायालयात सायबर क्राईम पोलिसांकडून कडून आरोपीं विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सध्या खटला दोषारोप पत्र निश्चितीसाठी प्रलंबित आहे. आरोपी अश्वीन कुमारच्या वतीने ॲड. मिलिंद द.पवार, ॲड.अक्षय शिंदे, ॲड. हर्षवर्धन मिलिंद पवार यांनी सायबर क्राईम पोलीस पुणे यांनी जवळपास एक कोटी रूपयांचे सोने चांदी व हिर्याचे जप्त केलेले दागिने आरोपीला परत मिळावेत असा अर्ज केला होता.
पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश श्री. व्ही.पी. खंदारे यांनी आरोपी अश्वीन कुमारचा अर्ज मंजूर केला. वीस लाख रूपयांच्या बंधपत्रावर व खटल्याचा निकाल लागेपर्यंत सर्व दागिने न विकण्याच्या अटी शर्तीवर जप्त केलेले सर्व दागिने परत करण्याचे सायबर क्राईम पोलीस पुणे यांना केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
-अयोध्येतील राम मंदिरानंतर लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदीर; फडणवीसांचा विश्वास
-‘आधी साधी विचारपूस पण केली नव्हती आता मात्र…’; अजित पवारांची बोचरी टीका
-“ज्यांनी पक्ष उभारला त्यांच्याकडून काढला अन् दुसऱ्याला दिला असं देशात कधीच घडलं नव्हतं”
-सुनील देवधरांनी मुहूर्त साधला! बाईक रॅलीच्या माध्यमातून पुण्येश्वराचा नारा देत वातावरण निर्मिती