पुणे : राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे दर्शन घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी गीत-भक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधला.
‘आयोध्या काशी आणि मथुरा ही ठिकाणे अत्यंत पवित्र आहेत. ज्या पद्धतीने राम जन्मभूमी निर्माण झाली, त्या पद्धतीने मथुरा येथे कृष्ण मंदिर निर्माण व्हावे ही लोकांची अपेक्षा आहे. मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत राम मंदिर निर्माण झाले. त्याच पद्धतीने श्रीकृष्ण मंदिर सौहार्दपूर्ण वातावरणात निर्माण होईल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
🕦 11.45am | 11-2-2024 📍 Pune | स. ११.४५ वा. | ११-२-२०२४ 📍 पुणे.
LIVE | Media interaction.#Maharashtra #Pune https://t.co/ZhWbhzv6VG
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) February 11, 2024
यावळे बोलताना त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘कोण संजय राऊत? ते काय मोठे नेते आहेत का? मोठे नेते असतील तर मला विचारा’, अशा शब्दांत फडणवीसांनी राऊत यांच्यावर टीका केली.
आचार्य प्रमोद कृष्णम यांना काँग्रेसने निलंबित केल्याच्या मुद्द्यावरुनही फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली. ‘त्यांचा दोष येवढाच आहे की त्यांनी काँग्रेसला सांगितले, की राम आणि राम मंदिराला विरोध करू नका. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली’ असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘आधी साधी विचारपूस पण केली नव्हती आता मात्र…’; अजित पवारांची बोचरी टीका
-“ज्यांनी पक्ष उभारला त्यांच्याकडून काढला अन् दुसऱ्याला दिला असं देशात कधीच घडलं नव्हतं”
-सुनील देवधरांनी मुहूर्त साधला! बाईक रॅलीच्या माध्यमातून पुण्येश्वराचा नारा देत वातावरण निर्मिती
-“महाराष्ट्र या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”- शरद पवार
-‘कोण संजय राऊत? फार मोठे नेते आहेत?’; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका