पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष दोन्ही दिले. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आज पुण्यातील बालेवाडी येथे राष्ट्रवादी युवक मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर नाव न घेता ताशेरे ओढले आहेत.
‘या पार्टीत कोणालाही फोन केले जात नव्हते. कोणाचीही विचारपूस केली जात नव्हती. मात्र आता फोन केले जातात, विचारपूस केली जाते. मात्र तुमच्या मनाची कोणतीही चलबिचल होऊ देऊ नका आणि याला बळी पडू नका’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा कार्यकर्त्यांना केले आहे.
‘२००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस ही विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद घेता आले असते, मात्र ते घेता आले नाही. त्याच्या खोलात मी जाणार नाही. आता मात्र जरा दमाने घ्या. थोडी कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका. अगोदर आपली संघटना मजबूत करू या’, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
‘तुमचे कुठलेही काम आणले कुठलाही प्रश्न आणला, तरी तो सोडवला जाईल. आपल्याला एका नव्या विचाराने पुढे जायचे आहे. आपल्या पक्षाची कुठलीही फरफट होऊ नये, यासाठी ही नवी भूमिका स्वीकारली असून आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवायचे आहे, कारण त्यांच्याकडे व्हिजन आहे’, असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“ज्यांनी पक्ष उभारला त्यांच्याकडून काढला अन् दुसऱ्याला दिला असं देशात कधीच घडलं नव्हतं”
-सुनील देवधरांनी मुहूर्त साधला! बाईक रॅलीच्या माध्यमातून पुण्येश्वराचा नारा देत वातावरण निर्मिती
-“महाराष्ट्र या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”- शरद पवार
-‘कोण संजय राऊत? फार मोठे नेते आहेत?’; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
-वागळे प्रकरणाच्या हल्लेखोरांची परेड का काढली नाही? राऊतांचा राज्य सरकारला सवाल