पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे नेते शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरुन सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली आहे.
“पुण्यात एका व्यक्तीवर हल्ला केला, गाडीवर हल्ला केला, गाडी फोडण्यात आली, याच अर्थ असा की, आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात. ही लोकांना पटणारी नाही, महाराष्ट्रात या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. ज्या पक्षाने हे उद्योग केले याची दखल राज्य आणि केंद्राने घ्यायला हवी होती ती घेतली नाही, ही दुर्दैवी घटना आहे”, असं म्हणत शरद पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
फडणवीसांनी राजीनामा द्यावा
राजीनामा मागणं विरोधकाचं काम आहे. खोलात जात नाही. ही गोष्ट घडत आहे. त्यावेळी पण ज्याच्याकडे कायदा सुव्यवस्था जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. पण त्याच्या जास्त खोलात गेलो नाही, असेही शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘कोण संजय राऊत? फार मोठे नेते आहेत?’; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
-वागळे प्रकरणाच्या हल्लेखोरांची परेड का काढली नाही? राऊतांचा राज्य सरकारला सवाल
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससूनमधून फरार; पोलीस दलात खळबळ
-पुण्यात पुन्हा एकदा थाडथाड; आधी मित्रावर गोळीबार पुन्हा स्वतःला संपवलं
-वागळे हल्ला प्रकरण: भाजपचे दीपक पोटे, बापू मानकरांसह १० जणांना पोलिसांनी केली अटक