पुणे : राज्यात विशेषत: पुणे शहरात वाढती गुन्हेगारी आणि गुंडांची दहशत वाढत आहे. गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरण ताजे असतानाच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोषाळकर यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावरुन राज्यकर्यांवर विरोधकांनी गरळ ओकली आहे. या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत.
विरोधी पक्षांकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत बोचरी टीका केली आहे. ‘राज्यात गुंडांचं राज्य चालू आहे’ असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
"कोण संजय राऊत? फार मोठे नेते आहेत?"@Dev_Fadnavis @rautsanjay61 @BJP4India pic.twitter.com/7863tRaEej
— Pune Local पुणे लोकल (@pune_local) February 11, 2024
यावर देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता फडणवीसांनी ‘कोण राऊत’ असं म्हणत टाळाटाळ केली. ‘कोण आहेत संजय राऊत. कोण फार मोठे नेते आहेत का? योग्य नेते असतील तर त्यांच्याबद्दल मला विचारा संजय राऊतांबद्दल काय विचारता’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलणे टाळले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वागळे प्रकरणाच्या हल्लेखोरांची परेड का काढली नाही? राऊतांचा राज्य सरकारला सवाल
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससूनमधून फरार; पोलीस दलात खळबळ
-पुण्यात पुन्हा एकदा थाडथाड; आधी मित्रावर गोळीबार पुन्हा स्वतःला संपवलं
-वागळे हल्ला प्रकरण: भाजपचे दीपक पोटे, बापू मानकरांसह १० जणांना पोलिसांनी केली अटक
-‘पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी’; निखिल वागळेंना समर्थन देणारा नेता कोण?