पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्यात गुंडांच्या टोळ्या भरदिवसा कसलीच भीती न बाळगता सर्रास खून, मारामारी, दमदाटी करत आपली दहशत माजवत असतात. या प्रकरणाची आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला असल्याची खात्रीशीर माहिती आता समोर आली आहे.
येरवडा जेलमधून प्रकृती खराब असल्याच्या कारणाने लीलाकर याला ससून रुग्णालयमध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती मिळत आहे. फरार असलेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 8 पथके पाठवली असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळला धमकवल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मार्शल लीलाकारला अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पुन्हा एकदा थाडथाड; आधी मित्रावर गोळीबार पुन्हा स्वतःला संपवलं
-वागळे हल्ला प्रकरण: भाजपचे दीपक पोटे, बापू मानकरांसह १० जणांना पोलिसांनी केली अटक
-‘पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी’; निखिल वागळेंना समर्थन देणारा नेता कोण?
-पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर ‘आप’चा आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार
-गाडीवरुन फटफट करत जाणं बुलेटस्वारांना भोवलं; पुणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई