पुणे : पुणे शहरामध्ये काल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या “निर्भय बनो” सभेपूर्वी त्यांच्या गाडीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्या दरम्यान वागळे यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. संध्याकाळी दांडेकर पूल परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आल्याने विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. वागळे यांच्यावर हल्ला झाल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी अटक केली आहे.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या “निर्भय बनो” या सभेचे दांडेकर पूल परिसरामध्ये असणाऱ्या साने गुरुजी स्मारक येथे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वागळे यांच्याकडून करण्यात आलेल्या पोस्टमुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. सभा उधळून लावण्याचा इशारा देखील त्यांच्याकडून करण्यात देण्यात आला होता. काल संध्याकाळी सरोदे यांच्या घरातून निघाल्यापासून वागळे यांच्या गाडीवर चार ते पाच वेळा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात भाजप तसेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेले भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पोटे, पदाधिकारी गणेश घोष, गणेश शेरला, बापू मानकर, स्वप्निल नाईक, प्रतीक देसरडा, दुष्यंत मोहोळ, गिरीश मानकर, राहुल पायगुडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्ता सागरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी’; निखिल वागळेंना समर्थन देणारा नेता कोण?
-पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर ‘आप’चा आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार
-गाडीवरुन फटफट करत जाणं बुलेटस्वारांना भोवलं; पुणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
-“आता फक्त एकच दादा ते म्हणजे…” वागळेंच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
-राज ठाकरे ‘इतिहास संशोधक मंडळा’त पोहचले अन् दिली ‘ही’ मोठी देणगी