पुणे : पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडूनं हल्ला झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटाने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. अशातच आता एका राजकीय पक्षाच्या नेत्याने निखिल वागळे यांच्या हल्ल्याचा निषेध करत त्यांना वागळेच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
निखिल वागळे यांच्यावरील हल्ला प्रकरण आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. काल (शुक्रवारी) हल्ला झाल्यानंतर अनेकांनी निखिल वागळे यांना समर्थन दिले आहे. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी अॅड असीम सरोदे यांची भेट घेतली. यावेळी आपण सोबत असल्याचं विश्वजीत कदम म्हणाले आहेत.
‘या प्रकरणी विधिमंडळात आम्ही आवाज उठवणार आहोत. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पाठीशी आहोत. अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी’, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर ‘आप’चा आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार
-गाडीवरुन फटफट करत जाणं बुलेटस्वारांना भोवलं; पुणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
-“आता फक्त एकच दादा ते म्हणजे…” वागळेंच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
-राज ठाकरे ‘इतिहास संशोधक मंडळा’त पोहचले अन् दिली ‘ही’ मोठी देणगी
-पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी